सिरीयल... मनोरंजन की डोक्याला ताप
सिरीयल... मनोरंजन की डोक्याला ताप
✍️ सखी थरवळ
आई कुठे काय करते ह्या माझ्या लेखाला सगळ्यांनी खूप छान प्रतिसाद दिला आणि मुख्य म्हणजे सगळ्या प्रतिक्रिया ह्या माझ्या बाजूने च होत्या😇 मी अगदी बरोबर लिहिलंय, आम्हाला ही हे पटलं नाही असच साऱ्यांच म्हणणं होत शिवाय सगळ्यांना लेख फार आवडला त्याबद्दल मनापासून आभार 🙏😊 तो लेख वाचल्यानंतर बऱ्याच जणांकडून बाकी मलिकांबद्दल ही तक्रारी आल्या ज्या मी ह्या लेखात मांडत आहे.
मला स्वतःला आत्ता पर्यंत श्रीयुत गंगाधर टिपरे, एका लग्नाची दुसरी गोष्ट, एका लग्नाची तिसरी गोष्ट, चूक भूल द्यावी घ्यावी, दिल दोस्ती दुनियादारी आणि रुद्रम् ह्या एवढ्याच मालिका स्टार्ट टु एंड आवडल्या आणि ज्या मी अजुनही मोबाईल वर पाहते, माझ्या मते ह्या मालिका कधीच जुन्या होणार नाही.
तर मूळ मुद्दा असा आहे की सध्या टीव्ही वर पाहण्याजोगी एक ही मालिका नाही अशी बऱ्याच जणांची तक्रार आहे. पण माझं सगळ्यात जास्त डोकं फिरतं ते स्टार प्रवाह वरील विठू माउली चे प्रोमो पाहून 🤯 लहानपापासून आपण देवांच्या गोष्टी ऐकल्या, वाचल्या, पहिल्या पण विठोबाचे हे असे किस्से नाही बुवा कुठे ऐकले, ना वाचले. कुठे लिहिलंय असं की कली आणि विठोबाची बरीच युद्ध झालेली, सगळे संत मंडळी कसल्या तरी अडचणीत अडकले ज्यांना कारणीभूत कली होता आणि विठू माउली त्यांना सोडवतो सगळं डोक्याच्या वरून जातं बाबा 😵🥴 ह्या वाहिनीवरील अग्निहोत्र मी पाहते जे अजून तरी पाहण्या जोग वाटतंय. रंग माझा वेगळा ची कन्सेप्ट च मला पटली नाही आणि माझ्या सारखे बरेच जण आहेत ज्यांचा हाच विचार आहे.
आता येते झी मराठी कडे. जर मी चुकत नसेल तर कोणे एके काळी अल्फा मराठी नावाने सुरू झालेली ही वाहिनी २४ तास मराठी सिरीयल दाखवणारी पहिली वहिली आणि एकमेव मराठी वाहिनी होती मग कालांतराने तीच नाव झी मराठी झालं. सुरुवातीपासूनच अगदी काल परवा पर्यंत ही वाहिनी अगदी उच्च पदावर होती पण सध्या एक दोन मालिका सोडल्या तर ज्या मालिका ह्यावर सुरू आहेत त्यामुळे शिव्या खाण्यात ही वाहिनी उच्च पदावर गेली आहे 😣 तुझ्यात जीव रंगला मध्ये हिंदी मालिके प्रमाणे हीरो मरतो आणि दुसरीकडे तसाच दिसणारा पण त्याच्या स्वभावाच्या उलट स्वभावाचा माणूस पुन्हा हीरो बनून नायिकेच्या आयुष्यात येतो 🤦 मिसेस मुख्यमंत्री बद्दल तर बोलून आणि लिहून मी थकले 😒 त्या मालिकेत दाखवल्या जाणाऱ्या पांचट पणा वर कितीही लिहिलं तरी कमीच आहे, त्या सुमिला पाहील की माझ्या प्रमाणेच बऱ्याच जणांचे डोकं फिरत त्यामुळे तिच्या बद्दल न बोललेले बरे. लग्नाची वाइफ वेडींगची बायको ह्या मालिकेचा हेतूच समजला नाही मला, ह्या मालिके बद्दल खूप प्रश्न आहेत मला म्हणजे ही मालिका का बरं काढली असावी? ह्यातील कलाकारांनी हयात काम करण्या आधी आपण काय काम करणार आहोत, आपला काय रोल आहे हे आधी समजून घेतलं नाही का? आणि जर घेतलं तरीही मालिका स्वीकारली कशी? आणि सगळ्यात मोठा प्रश्न ही मालिका कोण बघत असेल बरं? असो तिच्या बद्दल न बोललेले बरे त्यानंतर येते राधिका 🙄🥴🤢 हिच्या बद्दल बोलून आणि लिहून अख्खा महाराष्ट्र थकला. वाटलं गुरूच आणि शानायाच प्रकरण समजल्यावर काही दिवसात मालिका संपेल मग वाटलं ह्यांना धडा शिकवून गुरु पुन्हा राधिका कडे येईल मग मालिका संपेल मग वाटलं आता राधिका एकटीने सगळं नीट सांभाळू शकते स्वतः च्या पायावर उभी राहिली आहे म्हणजे आता मालिका संपेल पण ही तर मारुतीची शेपटीच निघाली वाढतच जातेय 😒 कधी वेळ असेल तर झी मराठी च्या फेसबुक पेज वर जा आणि ह्या मालिकेच्या प्रोमो खालील कॉमेंट्स वाचा तुम्हाला समजेल लोक किती शिव्या घालत आहेत ह्या मालिकेला काहींनी सभ्य भाषेत समजावलं काहींनी अगदी खालच्या थराला जाऊन शिव्या घातल्या पण ह्या मालिकेच्या टीम वर आणि झी मराठी वर कसलाच परिणाम झालेला दिसत नाही. अग्गबाई सासूबाई, सुरुवातीला खूप कौतुक ऐकलं ह्या मालिकेचं सगळ्यांच्या तोंडी ह्यातील पात्रांच तोंड भरून कौतुक आणि किस्से ऐकू येत होते पण आता तीच लोक तोंड वाकडं करून मालिकेला नावं ठेवत आहेत 🤷 कोणे एके काळी प्रेम चोप्रा मुळे मुलाचं नाव कुणी प्रेम ठेवत नव्हतं म्हणे. द ग्रेट विलन प्राण ह्यांच्या खल नयिकी मुळे की काय पण मी आज तागायत कुणाचही नाव प्राण ऐकलं नाही तसचं आजकाल म्हणे सोहम नाव ऐकलं की बायकांच्या कपाळाला आठ्या पडतात 😥 असावरीचा मुलगा सोहम आणि सासरे ह्यांच्या नावाने सगळे बोटं मोडत आहेत म्हणे बरं हे न पटणारा देखील एक वर्ग आहे की ह्या वयात हे अस काही शोभत का वैगेरे वैगेरे तर ही मालिका देखील आता चांगली राहिली नाही असच बऱ्याच जणांचे मत आहे. भगो मोहन प्यारे बद्दल मला काही एक बोलायचं नाहीये ती मालिका कुणीच पाहत नसेल असा मला ठाम विश्वास आहे फक्त एकच प्रश्न सतावतो की अतुल परचुरे सारख्या गुणी कलाकाराने ही मालिका का बरं स्वीकारली असेल? 🥴🤢🤷 अल्टी पलटी बद्दल समिश्र प्रतिक्रिया ऐकण्यात आल्या आहेत थोड फार मनोरंजन आणि शेवटी काही तरी बोध अशी काहीशी ही मालिका आहे अस ऐकलं आहे. छत्रपती संभाजी महाराज बद्दल पण काहीजण खेद व्यक्त करणारे भेटले की काही ठिकाणी इतिहास चुकीचा दाखवला आहे म्हणून. रात्रीस खेळ चाले जरा चांगली आहे पण मध्येच कधीतरी कंटाळा ही आणते नको तिथे भरकटत जाते असं काहींचं मत आहे.
झी युवा सुरवातीला खूप छान होती. बन मस्का, लव लग्न लोचा, फ्रेशर्स सारख्या नावाप्रमाणेच युवा मालिका घेऊन ह्या वाहिनीने दणक्यात सुरुवात केली आणि आता काय तर लव पोयजन अशाच काहीशा नावाची मालिका ह्यावर सुरू आहे ज्यातील नायिका साप आहे म्हणे 🤦😵 अरे काय हे? रूद्रम सारखी माईल स्टोन असलेली मालिका तुम्ही आम्हाला दिली आणि आता हे असं? 🥴🤦🤷
थोडक्यात काय तर सध्या टीव्ही पाहू नये कारण पाहण्यासारख काहीच नाहीये टीव्ही वर म्हणून तर आजकाल वेबसिरिज लोकांना जास्त आवडतं, माझ्या सारखे बरेच जण आहेत जे ह्यामुळे वाचनाकडे वळले, सिरीयल न पाहता एखाद छानस पुस्तकं वाचण्यात मी धन्यता मानते.
वाटतं पूर्वी बर होत सगळीकडे दूर दर्शन ही एकच वाहिनी होती पण छान होती. असो शेवटी काय ज्याचा त्याचा प्रश्न, ज्याची त्याची आवड नाहीच पटलं तर रिमोट कंट्रोल तुमच्या हातात आहेच 👍

This comment has been removed by the author.
ReplyDeleteखुप छान... सर्वात प्रथम खुप खुप शुभेच्छा उत्कृष्ट लिखाणासाठी.
ReplyDeleteThank you Dada 😇
Deleteछान लिहिलात मॅडम.... खरं आहे ह्या असल्या ठुकार सिरीयल दाखवून लोकांचं मनोरंजन करण्याऐवजी लोकांना विवेकहीन करायचं काम या सिरीयल करतायत आणि त्यामुळेच आज समाजामध्ये व्यभिचार वाढायला लागलाय
ReplyDeleteKhup chan. Tumhi liha amhi vachto
ReplyDeleteधन्यवाद 😇
ReplyDeleteChan ahe
ReplyDeleteएकदम खरंखरं आणि अगदी मनातलं
ReplyDeleteकाही काही सेरिअल्स अगदी वात आणतात
ReplyDeleteThank u 😊
ReplyDeleteAgadi yogya n Patel as lihilay..khi suddha interest nhiyay ata serial mdhe...He Mann Baware ya bddl Kai mat ahe...
ReplyDeleteमुळात मी ती मालिका पाहत नाही, पण सुरवातीला तिचेही फार कौतुक ऐकू आले होते पण आता ती देखील इतरांप्रमाणे रटाळ झालिये असच ऐकू येतंय 🥴
Deleteखूप छान व्यक्त झाल्या आहात तुम्ही .झी मराठी वरच नाही तर बहुतेक सर्वच वाहीन्यांवर हाच प्रकार चालू आहे कलर्स वरची मन बावरे ही सुरवातीला चांगली वाटली पण आता कुठे चाललीय हे त्यांनाच कळत नाही
ReplyDeleteझी मराठी म्हणजे तर कहर आहेत .एकापेक्षा एक फालतू मालिका निर्माण करण्याचा विक्रमच केलाय त्यातल्या त्यात रागाचा 2 बरी वाटली होती पण आता तीही कुठल्या दिशेने चाललीय तेच कळत नाही 31डिसेंबरचा गोवा एपीसोड पाहून ह्या मालिकेला भूतकथा,भयकथा,, रहस्यकथा, सूडकथा,क्रौर्याकथा म्हणावे तर असले रोमँटीक सीन विनाकारण दाखवल्याने प्रेमकथा म्हणावे हेच कळेनासे झालेय शिवाय फॅमिली ड्रामा आहे तो वेगळाच
हे सर्व प्रकार पाहून आपण डिश किंवा केबलसाठी पैसे कशासाठी भरतो व त्या बदल्यात आपल्याला काय मनोरंजन मिळते हा प्रश्न पडतो .
भाविकांच्या एपीसोड वर नियंत्रण आणणे हा एक ह्यावर उपाय होऊ शकेल
आपले विचार आपण उत्तम रितीने मांडले ह्याबद्दल खरेच अभिनंदन
सुधीर याडकीकर
Thank u 😊
Deleteसगळ्यांचे आभार 😊🙏
ReplyDeleteअगदी खरं आहे.👌👌👌
ReplyDeleteAagadi barobar aahe.khup Chan Mandalay Tumhi
ReplyDeleteखुप छान
ReplyDeleteChhan lekh ahe.... patal mla.. Khitri changal ani patel as dakhval pahije...
ReplyDeleteखरच खुपच सुंदर लिहिलंय.. आमच्या कडून तुला खुप खुप शुभेच्छा
ReplyDeleteखरंच खूप छान लिहिलं आहेस..असच छान छान लिहीत जा...खूप खूप शुभेच्छा तुला सखी...💐💐💐
ReplyDeleteThank you all for this lovely comments 😍🤩
ReplyDelete
ReplyDeleteतुझा हा लेख त्या सिरियलवाल्यांपर्यत गेला तर त्यांच्यावर नक्की परिणाम करेल.?
हो खरच
ReplyDeleteVery nice and proud to u and best of luck 💐💐🙏
ReplyDeleteThank you so much ❤️
ReplyDelete����
ReplyDelete