जोरा जोरी चने के खेत में 😞😟
जोरा जोरी चने के खेत में 😞😟
✍️ सखी थरवळ
माधुरी दिक्षित वर चित्रित केलेलं हे सुपरहिट गाणं जे परवा पर्यंत माझंही आवडतं होत ते काल मी माझ्या प्ले लिस्ट मधून डिलीट केलं. मर्दानी २ पाहिल्यानंतर डोक्यात मुलींवर होणारे अत्याचार आणि बलात्कार हा विषय थैमान घालत होता आणि प्ले लिस्ट नुसार हे गाणं लागलं आणि ते ऐकताना मला असं वाटू लागलं की ह्या गाण्याचे जे बोल आहेत ते एका बलात्काराची गोष्ट आहे... एकदम भयानक वाटलं ना? काळजात चर्र झालं असेल ना? मलाही खूप अस्वस्थ झालं जेव्हा ह्या गाण्याचा शब्द न शब्द माझ्या कानावर पडत होता आणि एका बलात्काराची व्यथा मांडत होता... 😒
अठरा बरस की कंवारी कली थी
घूँघट में मुखड़ा छुपके चली थी
फँसी गोरी, फँसी गोरी चने के खेत में
हुई चोरी चने के खेत में
हे गाण्याचे ध्रुवपद, स्पष्टपणे लिहिलंय की अठरा वर्षांची मुलगी पदरा आड तोंड लपवून चालली होती आणि चण्याच्या शेतात फसली आणि तीची चोरी झाली आता काय चोरी झाली हे आपण समजून घ्यावं
पहले तो जुल्मी ने पकड़ी कलाई
फिर उसने चुपके से ऊँगली दबाई
जोरा जोरी, जोरा जोरी चने के खेत में
हुई चोरी चने के खेत में
ह्या ओळी ही साफ सांगतायत की त्याने आधी तिचा हात पकडला मग तिच्यावर जबरदस्ती केली 😖
मेरे आगे पीछे शिकारियों के घेरे
बैठे वहाँ सारे जवानी के लुटेरे
हारी मैं हारी पुकार के
यहाँ वहाँ देखी निहार के
जोबन पे चुनरी गिरा के चली थी
हाथों में कंगना सजा के चली थी
चूड़ी टूटी, चूड़ी टूटी चने के खेत में
जोरा जोरी...
तिच्या अवती भोवती ती जनावर होती जी तिची अब्रू लुटण्यासाठीच बसलेली होती, इकडे तिकडे पाहून तिने खूप आरडा ओरड केली पण कुणीही मदतीला धावून आल नाही आणि शेवटी तिने हार मानली 😞 अंगभर ओढणी घेऊन, हातभर बांगड्या घालून ती निघाली होती आणि त्या बांगड्या त्या चण्याच्या शेतात तुटल्या आणि ती ही तुटली...
तौबा मेरी तौबा, निगाहें ना मिलाऊँ
ऐसे कैसे सबको कहानी मैं बताऊँ
क्या क्या हुआ मेरे साथ रे
कोई भी तो आया न हाथ रे
लहंगे में गोटा जड़ा के चली थी
बालों में गजरा लगा के चली थी
बाली छूटी चने के खेत में
जोरा जोरी...
त्या ठिकाणी तिच्या सोबत जे काही झालं त्यामुळे ती आता कुणाशी नजर मिळवू शकत नाहीये, तिच्या सोबत काय काय झालं हे सांगायची देखील तिला लाज वाटते आहे. छान सुंदर लेहांगा घालून ती निघाली होती, केसात गजरा देखील माळला होता, कानातले तुटले त्या चण्याच्या शेतात, तिच्यावर जबरदस्ती झाली त्या चण्याच्या शेतात...
१९९४ मध्ये आलेल्या अंजाम चित्रपटातील हे गीत तुफान गाजलं, आज ही ह्या गाण्यावर डान्स केला जातो. सौंदर्याची खाण ह्या शब्दांच जिवंत उदाहरण म्हणजे ह्या गाण्यातील माधुरी... जेवढी सुदंर ती ह्या गाण्यात दिसली आहे त्याहून सुंदर ती नाचली आहे, स्त्रियांना हेवा वाटणारे आणि पुरुषांना घायाळ करणारे तिचे एक्स्प्रेशन आणि अदा आज ही कुणी विसरलं नाहीये. चणे के खेत मे वाली आयकॉनिक स्टेप तर अजूनही लोक विसरले नाहीयेत. आजही एखाद्या अवॉर्ड सोहळ्यात किंवा रिऍलिटी शो मध्ये ती ह्या गाण्यावर परफॉर्म करताना दिसते आणि आपल्यालाही ती आवडते.
पण हे गाणं असं का? म्हणजे मी चुकत नसेल तर सिनेमा मध्ये एका लग्न सोहळ्यात माधुरीला सगळे डान्स करायला लावतात आणि ती ह्या गाण्यावर नाचते, अशा प्रसंगी काहीतरी लग्नाचं गाणं असावं ना जसं चांदणी मधील मेरे हाथो मे नों नो चुडिया किंवा डर मधील सोला बटण वाली चोली किंवा जुने सिनेमे पाहिले तर ये गलिया ये चोबारा आहे अनेक गाणी आहेत पण ह्या गाण्याचा आणि लग्न सोहळ्याचा संबंध काही समजला नाही मला.
बरं गाणं अगदी उत्तम, म्युझिक, रिदम, कोरिओग्राफी एकदम भन्नाट, नाव ठेवायला जागाच नाही पण खटकले ते शब्द... फक्त खटकलेच नाहीत तर काळीज धडधडायला लागलं ते शब्द ऐकून.
आपल्याकडे प्रणय गीत ही भरपूर आहेत, मन क्यू बेहका रे बेहका, बाहो मे चले आओ किंवा मराठी मधील काय बाई सांगू, मालवून टाक दीप अशी भली मोठी लिस्ट निघेल ज्यात शृंगार अगदी खच्चून भरलेला आहे पण ह्या सगळ्या गाण्यांमध्ये नायिकेची त्या शृंगारा ला संमती आहे, तिला ही तो हवा आहे पण ह्या गाण्यात अगदी स्पष्ट केले आहे की तिच्यावर जोर जबरदस्ती केलेली आहे. 😖
मला जो अर्थ ह्या गाण्याचा वाटतोय तो जर चुकीचा असेल तर मला खरंच खूप आनंद होईल पण जर तो तसाच असेल तर हे गाणं ज्यांनी लिहिलं, ज्यांनी कम्पोज केलं, कोरिओग्राफ केलं, शूट केलं त्या पूर्ण टीम पैकी कुणालाच ते आक्षेपार्ह का नाही वाटलं? जे शब्द माझ्या मनावर घाव करत आहेत त्यांनी त्यांच्या मनावर घाव का नाही केले? मी चुकीची असेल तर कृपया मला सांगा 🙏 मला जे ह्या गाण्याबद्दल वाटलं तेच जर इतर कुणालाही वाटत असेल तर मला नाही वाटत हे गाणं ती व्यक्ती यापुढे ऐकू शकेल अगदी माधुरी दिक्षित सुद्धा...

Baapre asa vichar kelach navta ...pan ashi aajkal khup gani ahet jyancha artha far vaait ahe tarihi tya ganyanvr kiti tari bayka aplya lahan lahan mulina nachayla lavtat ; tya ganyancha artha lakshat na gheta ..
ReplyDeleteत्यांचं अज्ञान आणि मुलांचं दुर्दैव अजून काय 😒
Deleteवास्तविकता अशी आहे कि कोणतंही गाणं असो प्रत्येक जण त्यातलं आपल्याला काय आवडत त्याप्रमाणे आपली प्रतिक्रिया ठरवतो कोणाला त्यातलं संगीत आवडत, कोणाला गायकाचा आवाज आवडतो, कोणाला त्यावरती केलेला डान्स आवडतो, कोणाला अशा गाण्यांवर डान्स करायला आवडतो त्यामुळे कोणीही गाण्याचे बोल काय आहेत एवढा बारकाईने कधी विचार करत नाही अथवा त्याचा अर्थ काय आहे याकडे लक्ष देत नाही परंतु तुम्ही आज खूप बारकाईने विचार करून छान पद्धतीने याचा अर्थ लिहिलात.
ReplyDeleteबऱ्याच जणांसाठी गाण्यातील शब्द हा फार गौण विषय आहे, कुणी लक्षात च घेत नाही म्हणून तर शिव्या आणि अश्लील शब्द सर्रास वापरले जातात गाण्यात
Deleteखरं आहे पण आपण आजकाल या गोष्टी कडे लक्ष देत नाही.... खुप छान लोकांना विचार करायला लावणारा लेख आहे
ReplyDeleteIt's true lekh vachun Mann bharun aale
ReplyDeleteThank you so much 😊
ReplyDeleteवा! वा!सखी छानच परीक्षण केलं आहेस तू या गण्याच!
ReplyDeleteमैने तो इस गाने को इसी नजर से नही देखा था!
It's nice observation Di🙏🙏👍
ReplyDelete👍👍
ReplyDeleteMy god.kitida he song eklay. Pan tyacha arth kholat jaun vichar suddha kela navta.bhayanak vastviktechi janiv zali arth ani ganyachya oli vachlyavar.
ReplyDeleteखरंच खूपच विदारक वास्तव ☹
ReplyDelete😞
ReplyDeleteVery true
Delete