Posts

कार्टून्स आणि भाषा

Image
कार्टून्स आणि भाषा ✍🏻 सखी थरवळ आजच्या काळात १०० मध्ये एखादच असं मुल असेल ज्याला एकही कार्टून माहीत नाही. लहान मूल आणि कार्टून हे समीकरणच आहे. अहो लहानच कशाला कार्टून म्हटलं की अगदी म्हातारी झालेली पिढी देखील लहान होते. प्रत्येकाचं असं एक फेवरेट कार्टून असतं आणि त्यामागे भरपूर आठवणी... माझा जन्म ९० च्या दशकातला त्यामुळे मी 90's किड्स मध्ये मोडते तर आमच्या काळी फॉर्म मध्ये असलेलं कार्टून म्हणजे टॉम अँड जेरी. हे कार्टून तसं पाहिलं तर खूप जुन पण ह्याची क्रेझ अजूनही आहे. ते म्हणतात ना किती आले किती गेले तरी ह्या सम हाच तस आहे ह्याचं. सारा खेळ ह्या दोघांच्या पकडा पकडी चा पण कधीच बोर नाही झालं. द जंगल बुक मधील मोगली ही तुफान गाजलं अजूनही त्यावर सिनेमे बनवले जातात. कथा तीच माहीत असलेली पण पाहायला मजा येते. नंतर नंतर डक टेल्स, पोपाय, लुनी टूनस आणि बरेच कार्टून्स आले. तेव्हा फक्त एकच चॅनेल असल्याने जास्त कार्टून्स नव्हते. पण मग केबल नेटवर्क आले आणि त्यात एक चॅनेल आला कार्टून नेटवर्क ज्यावर चोवीस तास कार्टून्स दाखवले जायचे. आता तसे बरेच चॅनल्स आहेत ज्यावर चोवीस तास फक्त क...

जोरा जोरी चने के खेत में 😞😟

Image
जोरा जोरी चने के खेत में 😞😟 ✍️ सखी थरवळ माधुरी दिक्षित वर चित्रित केलेलं हे सुपरहिट गाणं जे परवा पर्यंत माझंही आवडतं होत ते काल मी माझ्या प्ले लिस्ट मधून डिलीट केलं. मर्दानी २ पाहिल्यानंतर डोक्यात मुलींवर होणारे अत्याचार आणि बलात्कार हा विषय थैमान घालत होता आणि प्ले लिस्ट नुसार हे गाणं लागलं आणि ते ऐकताना मला असं वाटू लागलं की ह्या गाण्याचे जे बोल आहेत ते एका बलात्काराची गोष्ट आहे... एकदम भयानक वाटलं ना? काळजात चर्र झालं असेल ना? मलाही खूप अस्वस्थ झालं जेव्हा ह्या गाण्याचा शब्द न शब्द माझ्या कानावर पडत होता आणि एका बलात्काराची व्यथा मांडत होता... 😒 अठरा बरस की कंवारी कली थी घूँघट में मुखड़ा छुपके चली थी फँसी गोरी, फँसी गोरी चने के खेत में हुई चोरी चने के खेत में हे गाण्याचे ध्रुवपद, स्पष्टपणे लिहिलंय की अठरा वर्षांची मुलगी पदरा आड तोंड लपवून चालली होती आणि चण्याच्या शेतात फसली आणि तीची चोरी झाली आता काय चोरी झाली हे आपण समजून घ्यावं पहले तो जुल्मी ने पकड़ी कलाई फिर उसने चुपके से ऊँगली दबाई जोरा जोरी, जोरा जोरी चने के खेत में हुई चोरी चने के खेत में ह्या ओळी ही स...

मर्दानी 💪

Image
मर्दानी 💪 ✍️ सखी थरवळ काल राणी मुखर्जी चा सिनेमा मर्दानी आणि मर्दानी २ पाहिला. शब्दात व्यक्त करू नाही शकत एवढे दुःख झाले की हा एवढा दर्जेदार सिनेमा मी थिएटर मध्ये जाऊन का नाही पाहिला 😔😖 त्याहून जास्त दुःख हे समजल्यावर झाले की मर्दानी २ पण येऊन गेला आणि तो ही मी थिएटर ला जाऊन नाही पाहिला. खरं म्हणजे मर्दानी २ केव्हा आला हेच मला माहित नाही त्यामुळे मी तो पहिला नाही 😔 असो, मर्दानी पाहिला आणि राणीच्या प्रेमात पडले 😍 २२ ऑगस्ट २०१४ मध्ये रिलीज झालेल्या ह्या सिनेमा मध्ये आहे शिवानी शिवाजी रॉय जी मुंबई मधील क्राईम ब्रांच ची सिनियर इन्स्पेक्टर आहे. दिसायला अत्यंत देखणी ही शिवानी जेवढी प्रेमळ तेव्हढीच राकट, मर्दानी आहे. राणीला ह्या पूर्वी आपण साडी, ड्रेस, शॉर्ट ड्रेस अशा वेगवेगळ्या पोशाखात पाहिलं आहे पण इथे पूर्ण सिनेमा मध्ये तिने शर्ट आणि जीन्स घातली आहे पण तरीही ती अतिशय सुंदर दिसली आहे आणि खरं सांगते एवढी सुंदर राणी मला या आधी कधीच वाटली नव्हती. सुंदर दिसून ही एक कडकपणा, एक attitude तिने चेहऱ्यावर खूप छान आणला आहे जो तिला अतिशय शोभून दिसतो. ह्या सिनेमा ची कथा आहे एका सेक्स रॅके...

सिरीयल... मनोरंजन की डोक्याला ताप

सिरीयल... मनोरंजन की डोक्याला ताप ✍️ सखी थरवळ आई कुठे काय करते ह्या माझ्या लेखाला सगळ्यांनी खूप छान प्रतिसाद दिला आणि मुख्य म्हणजे सगळ्या प्रतिक्रिया ह्या माझ्या बाजूने च होत्या😇 मी अगदी बरोबर लिहिलंय, आम्हाला ही हे पटलं नाही असच साऱ्यांच म्हणणं होत शिवाय सगळ्यांना लेख फार आवडला त्याबद्दल मनापासून आभार 🙏😊 तो लेख वाचल्यानंतर बऱ्याच जणांकडून बाकी मलिकांबद्दल ही तक्रारी आल्या ज्या मी ह्या लेखात मांडत आहे. मला स्वतःला आत्ता पर्यंत श्रीयुत गंगाधर टिपरे, एका लग्नाची दुसरी गोष्ट, एका लग्नाची तिसरी गोष्ट, चूक भूल द्यावी घ्यावी, दिल दोस्ती दुनियादारी आणि रुद्रम् ह्या एवढ्याच मालिका स्टार्ट टु एंड आवडल्या आणि ज्या मी अजुनही मोबाईल वर पाहते, माझ्या मते ह्या मालिका कधीच जुन्या होणार नाही.  तर मूळ मुद्दा असा आहे की सध्या टीव्ही वर पाहण्याजोगी एक ही मालिका नाही अशी बऱ्याच जणांची तक्रार आहे. पण माझं सगळ्यात जास्त डोकं फिरतं ते स्टार प्रवाह वरील विठू माउली चे प्रोमो पाहून 🤯 लहानपापासून आपण देवांच्या गोष्टी ऐकल्या, वाचल्या, पहिल्या पण विठोबाचे हे असे किस्से नाही बुवा कुठे ऐकले, ना वाचले. क...

आई कुठे काय करते 🙃

Image
आई कुठे काय करते 🙃 ✍️ सखी थरवळ अग्निहोत्र २ पाहत असताना ह्या सिरीयल चे प्रोमो फार त्रास देतात बुवा 🙄😒😕 हो हो त्रास च किती ते रडणं, स्वतःला कमी लेखण, आत रडू आणि ओठावर हसू असलेले भाव घेऊन बोलणं... काही सेकंद चालणारे ते प्रोमो पाहून डोकं उठलं होत 😰 आजकाल एवढं पण कुणी वाईट वागत नाही, पण ही सिरीयल आहे आणि ज्यात अतिशयोक्ती होणार नाही ती सिरीयल कशी म्हणावी नाही का? जेव्हा तुम्ही हाऊस वाइफ होण स्वीकारता तेव्हा घरातील काम करणं ओघाने आलंच आणि आपल्या घरात आपण स्वतःला मालकीण म्हणूनच बघायचं असतं मोलकरीण नाही तूच जर स्वतःला मोलकरीण म्हणत असशील तर दुसऱ्यांनी म्हंटल्यावर कशाला रडतेस? 🙄 बदाम भिजवताना हिने स्वतःसाठी ही भिजवले तर कोण नाही म्हणणार आहे का? पण हीलाच नको आणि मग रडायचं 🙄 इस्त्री चुकीची केल्यावर बोलणारच ना अर्थात बोलण्याची ही एक पद्धत हवी पण ती त्या मुलीला तू लहानपणीच लावायला हवी होती आणि आता ती उर्मट पाणे बोलते म्हणून का रडतेस? नवरा नेहमी डबा परत आणतो म्हणजे तुझ्या जेवणात काही कमी असेल ग ते सुधारून बघ 🤷 आजकाल प्रत्येकाला स्वतः ची अशी स्पेस हवी असते, मुलं मोठी झाल्यावर त्यांच्या र...